Home मुंबई कंगनाची पुन्हा मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका

कंगनाची पुन्हा मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका

9
0

मुंबई । काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत असलेल्या कंगनाने राणावतने परत एकदा आज (शनिवारी) ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे. कंगनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, कुठे राजा भोज, कुठे गंगु तेली, मुख्यमंत्र्यांनी सत्तेसाठी आपल्या वडिलांच्या विचारांना हरताळ फासला आहे. काही दिवसांपूर्वी रिपब्लिक टीव्ही केलेल्या कारवाईच्या संदर्भात कंगनाने ट्विट करत या घटनेचा निषेध केला होता. पत्रकारांवर अत्याचार करणारे हुकुमशाह सरकार असल्याचे म्हटले होते. या ट्विटनंतर आता मुख्यमंत्री ठाकरे कंगनाला काही प्रतिक्रिया देतात की, दुर्लक्ष करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here