Marathwada Sathi

रेखा जरे हत्या प्रकरणी पत्रकार बाळ बोठेची आज न्यायालयात सुनावणी…!

मराठवाडा साथी न्यूज

नगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणामधील मुख्य आरोपी असलेले पत्रकार बाळ बोठे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

३० नोव्हेंबरला त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील जातेगाव फाटा घाटात अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करुन रेखा जरे यांची हत्या केली..

त्यांच्या हत्या प्रकरणी आरोपींना अटक केले असून मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोटे पसार झाला आहे.दरम्यान,बोठे याने अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.त्यांच्या वतीने अॅड महेश तवले यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर आज जिल्हा व सत्र न्यायालयात प्राथमिक सुनावणी करण्यात येईल.

Exit mobile version