Marathwada Sathi

जेईई अॅडव्हान्स्ड चा अभ्यासक्रम जाहीर…!

मराठवाडा साथी न्यूज

खरगपूरने : आयआयटी खरगपूरने जेईई अॅडव्हान्स्ड २०२१ परीक्षेचा अभ्यासक्रम नुकताच जाहीर केला आहे.आयआयटी मधील इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा घेतली जात असते.त्यासंदर्भात परीक्षेच्या सिलॅबससह पेपर १ आणि पेपर २ ची ऑनलाइन मॉक टेस्टही अपलोड करण्यात आली आहे.

जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचे अधिकृत संकेतस्थळ jeeadv.ac.in वर याविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली असून आयआयटी खरगपूरद्वारे जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचे आयोजन शनिवार ३ जुलै २०२१ रोजी करण्यात येणार आहे. पेपर -१ ची परीक्षा सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत होईल. पेपर २ दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत असेल.यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्ससह आर्किटेक्चर एप्टीट्यूड टेस्ट चा अभ्यासक्रमदेखील जारी करण्यात आला आहे.

दरम्यान,आयआयटी खरगपूरने जेईई अॅडव्हान्स्ड २०२१ च्या तयारीसाठी ऑनलाइन सराव करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पेपर १ आणि पेपर २ दोन्हीसाठी ऑनलाइन मॉक टेस्ट जारी करण्यात आली आहे.

Exit mobile version