Home देश-विदेश WHO च्या नकाशात जम्मू-काश्मीर, लडाख भारताच्या बाहेर …..

WHO च्या नकाशात जम्मू-काश्मीर, लडाख भारताच्या बाहेर …..

644
0

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आपल्या वेबसाईटवर भारताचा चुकीचा नकाशा दाखवला आहे. यामध्ये जम्मू – काश्मीरसह लडाख भारतापासून वेगळा दाखवला गेला आहे. याप्रकरणी भारत सरकारने आता कडक भूमिका घेतली आहे. यावरुन भारताने जागतिक आरोग्य संघटनेनकडे नाराजी व्यक्त करत आक्षेप नोंदवला आहे.

संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी इंद्रमणी पांडे यांनी WHO चे डायरेक्टर जनरल टेड्रोस अधनोम घेब्रेसेस यांच्यासमोर हा मुद्दा उपस्थित केला असून नाराजी व्यक्त केली आहे. तसेच भारताच्या नकाशात झालेली चूक तातडीने बदलण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. भारताने WHO समोर एका महिन्यात तिसऱ्यांदा हा मुद्दा उपस्थित केलाय.काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेकडून आपल्या संकेतस्थळावर जारी करण्यात आलेल्या नकाशात भारतीय भूभाग हा गडद निळ्या रंगात दर्शवण्यात आलाय. तर जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भाग राखाडी रंगात दाखवण्यात आला. यावरुन वादंग निर्माण झाल्यानंतर आता भारताने WHO समोर आक्षेप नोंदवला आहे. उल्लेखनीय म्हणजे सध्या केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे डब्ल्यूएचओच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here