Marathwada Sathi

‘या’ भागांमध्ये असणार सर्वाधिक थंडी…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : IMD GFS मॉडेल नुसार राज्यात २० जाने.पासून किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये किमान तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत तर मराठवाडा व उत्तर मध्य महाराष्ट्रमध्ये काही भागात किमान पारा १४ अंश सेल्सिअस पर्यंत खाली येईल.तसेच मुंबई, ठाणे परिसरात १६ अंश सेल्सियसपर्यंत पारा खाली येण्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेन वर्तवला आहे. उत्तर भारतात थंडीची लाट असून त्याचा परिणाम म्हणून येत्या काही दिवसात थंडी वाढेल असा अंदाज आहे.

राज्यातील पूर्व विदर्भ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत तसेच अमरावती, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यात किमान सरासरी तापमान घसणार आहे. यंदा डिसेंबर महिन्यात मुंबईतील काही भागांमध्ये हलकासा पाऊस देखील पडला होता.त्यामुळे पुढील दोन दिवसानंतर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये वातावरणातील बदल दिसून येईल आणि किमान तापमान १२ ते १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Exit mobile version