Home क्रीडा …. हा सांघिक कामगिरीचा विजय ठरला- अजिंक्य रहाणे

…. हा सांघिक कामगिरीचा विजय ठरला- अजिंक्य रहाणे

658
0

ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियाने २९४ धावा करत भारताला विजयासाठी ३२८ धावांचे आव्हान दिले. भारतीय संघाने शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांच्या फलंदाजीच्या जोरावर ३२८ धावांचे कठीण आव्हान पार केलं. या विजयाबद्दल बोलताना अजिंक्यने काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.“आजचा हा विजय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा विजय शब्दात कसा वर्णन करावा हे मला माहिती नाही. आमच्या संघातील साऱ्या खेळाडूंचा मला अभिमान आहे. आम्हाला आमच्या संघाकडून सर्वोत्तम कामगिरी करून दाखवायची होती. मी जेव्हा फलंदाजीसाठी उतरलो तेव्हाच आम्हीच ठरवलं की जिंकण्यासाठी खेळायचं. मग मी माझ्या पद्धतीने खेळलो, कारण आमच्याकडे ऋषभ पंत आणि मयंक अग्रवाल हे दोघे शिल्लक होते. पुजाराला तर या विजयाचे श्रेय दिलेच पाहिजे. त्याने दडपणाचा चांगला सामना केला आणि त्यानंतर पंतने तर सामन्याचा शेवट अगदी उत्तम केला”, असं अजिंक्य म्हणाला.

“आमच्यासमोर मुख्य मुद्दा होता तो म्हणजे २० बळी मिळवण्याचा. आम्ही पाच गोलंदाजांसह खेळत होतो आणि त्यामुळे आम्हाला त्यांचा योग्य फायदा मिळाला. वॉशिंग्टन सुंदरमुळे आमच्या संघात समतोल कायम राहिला. सिराजने केवळ दोन सामने खेळले होते, सैनी आणि शार्दुलने एकमेव सामना खेळला होता. नटराजन तर नवखाच होता. पण पहिल्या सामन्यात काय घडलं याची आम्ही अजिबात चर्चा केली नाही. आम्ही केवळ मैदानात जाऊन खेळावर लक्ष दिलं. खेळपट्टीवर आम्ही सर्वस्व पणाला लावलं. त्यामुळे हा सांघिक कामगिरीचा विजय ठरला”, असे अजिंक्यने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here