Home क्राइम धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप करणे आणि तो परत मागे घेणे धक्कादायक ….

धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप करणे आणि तो परत मागे घेणे धक्कादायक ….

1063
0

चित्रा वाघ यांची धनंजय मुंडे प्रकरणावर प्रतिक्रिया

सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात केलेली बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतल्याचं वृत्त येताच चित्रा वाघ यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिली. “खोटे आरोप करणं, खोटे गुन्हे दाखल करणं चुकीचंच आहे. खोट्या आरोपांमुळे राजकीय कार्यकर्ता असूदे किंवा सामान्य माणूस तो उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही, आणि अशाप्रकारे जर महिला खोटे आरोप-गुन्हे दाखल करत असतील तर त्यामुळे खऱ्या पीडित महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलतो…हे समाजाच्या हिताचं नाहीये. त्यामुळे मुंबई पोलिसांनी खोटे आरोप लावणाऱ्या रेणू शर्मावर तात्काळ IPC192 नुसार कारवाई करावी”, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेने काल(दि.२१) मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली. कौटुंबिक कारणास्तव आणि प्रकरणाला राजकीय वळण लागल्यामुळे तक्रार मागे घेत असल्याचं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here