Home मुंबई अहमद पटेलांचा सत्तेच्या मोहात न पडणं हा गुण दुर्मिळच- राज ठाकरे

अहमद पटेलांचा सत्तेच्या मोहात न पडणं हा गुण दुर्मिळच- राज ठाकरे

641
0

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

अहमद पटेल यांच्या निधनाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. ट्विटरवर शोक संदेश पोस्ट करून राज यांनी अहमद पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली. अहमद पटेल ह्यांचं निवासस्थान अनेक सत्तांतराचं केंद्रस्थान होऊन देखील स्वतः सत्तेच्या, पदांच्या मोहात न पडणं हा गुण दुर्मिळच, असंही राज म्हणाले.अहमद पटेल कमालीचे चाणाक्ष, बुद्धिमान नेते होते, राजकारणाला बुद्धिबळाच्या पटावर ठेवून डाव-प्रतिडाव खेळण्यात ते माहीर होते, पण ही असाधारण क्षमता त्यांनी राजकीय लढाया जिंकण्यापुरतीच वापरली. तिला कधी त्यांनी व्यक्तिगत हेवेदावे ह्यासाठी वापरलं नाही. त्यामुळेच ह्या खंडप्राय देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांचा एखाद्याशी स्नेह तयार झाला की त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यातील सुखदुःखांच्या प्रसंगात ते ठाम उभे राहत ह्याचा अनुभव मी देखील घेतला आहे. 43 वर्षे सक्रिय राजकारणात राहून, आणि अहमद पटेल ह्यांचं निवासस्थान अनेक सत्तांतराचं केंद्रस्थान होऊन देखील स्वतः सत्तेच्या पदांच्या मोहात न पडणं हा गुण दुर्मिळच.अहमद पटेल यांचा मुलगा फैसल याने पहाटे 3.30 वाजता वडिलांचे दु:खद निधन झाले आहे, अशी माहिती दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here