Marathwada Sathi

संभाजी महाराजांचं नाव वापरणं हा काय गुन्हा नाही- संजय राऊत

नाशिक : भाजपच्या वसंत गीते आणि सुनील बागुल यांनी आजच शिवसेनेत प्रवेश केला. याच संदर्भात पत्रकार परिषदेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी औरंगाबाद नामांतरावरून सुरु असलेल्या वादावर मत मांडले. मुख्यमंत्र्यांच्या ट्विटवर “संभाजीनगर “ नाव टाकल्यामुळे सध्या वाद सुरु आहेत. “सरकारनं संभाजी महाराजांचं नाव वापरणं हा गुन्हा आहे का? छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजे यांचं नाव सरकारी कागदपत्रांवर किंवा ट्विटरवर वापरणं हा गुन्हा आहे असं मला असं वाटत नाही, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका घेतली ती योग्य आहे. सरकार हे मुख्यमंत्र्यांच्या नावानं चालतं आणि लोकभावनेवर चालते,असे विधानदेखील यावेळी राऊत यांनी केले.

तर याच मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेनं सरकारी यंत्रणेचा असा उपयोग करु नये, काय लिहायचं असेल ते सामनामध्ये लिहावं असं म्हटलं होत,यावरदेखील मुख्यमंत्री यांनी योग्य केल्याचे देखील राऊत यांनी म्हटले आहे. यावरून महाआघाडी सरकारमध्ये नामांतरावरून मतभेद दिसू लागले आहेत.

Exit mobile version