Home मनोरंजन इशान करतोय या अभिनेत्रीला डेट…!

इशान करतोय या अभिनेत्रीला डेट…!

83
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : सेलिब्रिटी कपल्स बद्द्ल जाणूनघेण्याकरीता सामान्य नागरिकांमध्ये नेहमीच फार उत्सुकता दिसून येते.मागील काही दिवसांपासून अभिनेता शाहिद कपूर याचा भाऊ आणि अभिनेता इशान खट्टर हा चांगलाच चर्चेत आला आहे.विशेष म्हणजे यावेळी तो त्याच्या अभिनय आणि कौशल्यामुळे नाही तर त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

मागील काही दिवसांपासून इशानचे नाव प्रसिद्ध अभिनेते चंकी पांडे यांनी कन्या अनन्या पांडे हिच्या सोबत जोडले जात आहे.रविवारी(३ जाने.)दोघेही मुंबई विमानतळावर एकत्रित दिसले.फक्त एव्हढेच नाहीतर या अगोदर सुद्धा मालदीवला जातांना ते सोबत दिसले होते.

दरम्यान,इशान-अनन्या यांनी सोबत मालदीमध्ये एकत्रच सुट्ट्या घालवल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्या दोघांनीही सोशल मीडियावर काही फोटोही पोस्ट केले,मात्र दोघांचा एकत्र एकही फोटो त्यांनी पोस्ट केलेला नाही.मात्र,इशानने ने शेअर केलेल्या एका फोटोच्या माध्यमातून ते दोघे एकत्रित असल्याचे समजून येते.

https://www.instagram.com/p/CJlegCUhtZE/?utm_source=ig_web_copy_link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here