Home क्रीडा IPL 2020, kkr vs csk : चेन्नईची प्रतिष्ठा तर कोलकात्याची प्लेऑफ साठी...

IPL 2020, kkr vs csk : चेन्नईची प्रतिष्ठा तर कोलकात्याची प्लेऑफ साठी होणार आज लढत

9
0


IPL 2020, kkr vs csk : आयपीएलच्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेलेला संघ चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना रंगणार आहे. दुसऱ्या बाजूला आयपीएलच्या पॉईंट टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर असलेला कोलकाता नाईट रायडर्सचा संघ विजय मिळवून प्लेऑफच्या शर्यतीतील आपलं आव्हान टिकवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. केकेआरने 12 सामने खेळले असून त्यांच्या पारड्यात 12 पॉईंट आहेत. त्यामुळे कोलकाताला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी पुढिल दोन्ही सामने जिंकणं गरजेचं आहे.

पॉईंट टेबलमध्ये सर्वात शेवटच्या स्थानावर चेन्नई

चेन्नई आयपीएलच्या पॉईंट टेबलमध्ये सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वात खेळणारा संघ प्रतिष्ठेसाठी आज मैदानात उतरणार आहे. चेन्नई सुपर किंग्सला यावर्षी 12 सामन्यांपैकी आठ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. केवळ चार सामन्यांमध्ये चेन्नईला विजय मिळवता आला आहे. तरिदेखील केकेआरसाठी चेन्नईचं आव्हान पार करणं सोपं नसेल. चेन्नईने आपल्या मागील सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगलोरचा आठ विकेट्सनी पराभव केला होता.

केकेआरसाठी फलंदाजांची कामगिरी चिंतेची बाब

गेल्या काही सामन्यांपासून केकेआरचे फलंदाज फारशी चांगली कामगिरी करु शकलेले नाहीत. संघाचा माजी कर्णधार आपली दमदार खेळी दाखवण्यात अयशस्वी ठरला आहे. तर नितीश राणा आणि राहुल त्रिपाठी यांच्या खेळीतही अनेक चढ-उतार पाहायला मिळत आहेत. तसेच इतर फलंदाजांनीही फारशी चांगली कामगिरी केलेली नाही.

केकेआरच्या गोलंदाजांनी मात्र आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. तमिळनाडूचा रहस्यमयी स्पिनर वरुण चक्रवर्तीने अत्यंत प्रभावील खेळी केली आहे. तसेच वरुण चक्रवर्तीला भारतीय टी20 संघातही स्थान देण्यात आलं आहे. लॉकी फर्ग्युसन संघात आल्यामुळे केकेआरची गोलंदाजी मजबूत झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here