मराठवाडा साथी न्यूज
मुंबई : भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे सायनाला हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन होण्यास सांगण्यात आले आहे.दरम्यान,थायलंड ओपन २०२१ या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू तयार झाले आहेत.मात्र,स्पर्धेच्या पहिल्याच दिवशीच सायना नेहवालचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे.
धक्कादायक म्हणजे फक्त सायनाचाच नाही तर भारताचा बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय याचा देखील कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे वृत्त समोर आले आहे. या दोघांनाही बँकॉक येथील स्थानिक रुग्णालयात पुढीत चाचणी आणि उपचारासाठी घेऊन जाण्यात आल्याचेही समजते.
दरम्यान,सायना मागील काही महिने दुखापतीमुळे त्रस्त होती.त्यानंतर ती पुन्हा बॅडमिंटन कोर्टवर सज्ज झाली.मात्र, आता तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने ती थायलंड ओपन नाही खेळू शकणार.