Marathwada Sathi

भारताचा “दिलदारपणा “

भूतान आणि मालदीव या शेजारील देशांना भेट स्वरूपात ‘कोरोना लस “

भारताने “सिरम “ आणि “कोविशील्ड ” या दोन लसींची निर्मिती करत जागतिक स्तरावर भारताचे नाव मोठे केले आहे. १६ जानेवारीपासून भारतात प्रथम कोविड योध्यांना ह्या लसी दिल्या जात आहेत. पण आता भारताचे अजून एका कारणाने कौतुक केले जात आहे. भारताने नेहमीच मदतवृत्ती जोपासली आहे. आता परत भारताने आपला दिलदारपणा दाखवून दिला आहे. भारताने शेजारील देश भूतान आणि मालदीवला भेटस्वरूपात कोरोना लस दिल्या आहेत.

एएनआयच्या माहितीनुसार, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन भूटानची राजधानी थिंफूकडे सीरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या कोविशिल्ड लसीचे १.५ लाख डोस पाठवण्यात आले आहेत. तसेच मालदीवची राजधानी माले येथे मुंबईतून कोविशिल्डचे १ लाख डोस पाठवण्यात येणार आहेत.
भारत हा जगातील लस निर्मिती उद्योगातील एक प्रमुख देश म्हणून ओळखला जातो. आजवर भारतानं जगातील अनेक देशांना विविध आजारांवरील औषधे तसेच लसींचा पुरवठा केला आहे. करोनाच्या या संकट काळात सध्या भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम सुरु आहे. दरम्यान, भारतातील कंपन्यांना जगातील अनेक देशांनी लस पुरवठ्यासाठी आगाऊ नोंदणी केली आहे. दरम्यान, भूटान आणि मालदीव या शेजारील देशांना भारतानं भेट स्वरुपात लस पाठवली आहे.

Exit mobile version