Marathwada Sathi

भारताचा ऐतिहासिक विजय …..

१०० वर्षांत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा गाबा मैदानावर पराभव

Aus vs Ind 4th Test : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत दणदणीत ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला ३२८ धावांचे आव्हान दिले होते. त्याच पाठलाग करत भारताने विजय मिळविला आहे. या विजयात रिषभ पंत यांनी अखेरपर्यंत लढत भारताला विजयी मार्गावर नेले.या विजयात शुभमन गिलचे ९१ रण आणि चेतेश्वर पुजाराचा संयमी खेळ भारताच्या विजयात मोलाचे योगदान ठरले . दरम्यान बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत गाबाच्या मैदानावर आतापर्यंत चौथ्या डावात २५० पेक्षा जास्त धावांचं आव्हान एकदाही कोणत्याही संघाला पार करता आलं नाही. शिवाय, मागील १०० वर्षात या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा संघ आतापर्यंत एकदाही पराभव झाला नाही. त्यामुळे ब्रिस्बेनमधील गाबा मैदानावरील हा रेकॉर्ड भारतीय संघ मोडणार का? याकडे क्रीडा प्रेमींचं लक्ष लागलं होत . त्यामुळे आजचा विजय ऐतिहासिक विजयबा मानला जात आहे. शिवाय ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्याच मैदानात हरवून भारताने ऑस्ट्रेलियाला नमविले आहे.

दरम्यान रिषभ पंतने 89 धावांची खेळी करत भारताला विजयी मार्गावर नेले.

Exit mobile version