Marathwada Sathi

तिसऱ्या कसोटीपूर्वी केएस भरत भारतीय खेळाडूचा पत्ता कट होण्याची शक्यता .

दिल्लीमध्ये रंगलेली दुसरी कसोटी 3 दिवसांमध्ये झाल्यानंतर आता तिसऱ्या कसोटीमध्ये काय होणार याबद्दल क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. पण तिसऱ्या कसोटीमध्ये भारतीय टीम मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तिसऱ्या कसोटीपूर्वी ‘केएस भरत या भारतीय खेळाडूचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा थरार सुरु आहे. दुसरा सामना दिल्लीमध्ये रंगल्यानंतर आता तिसरा सामना 1 मार्चपासून इंदूरला होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या या कसोटी सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून भरत ला टीम मधून बाद कारण्याची शक्यता आहे कारण , दोन मालिकेतील त्याचा खराब कामगिरीमुळे टीम इंडिया हा निर्णय घेणार असल्याचं बोलं जातं आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या कसोटीमध्ये विकेटकीपर केएस भरत आणि इशान किशनया दोन खेळाडूंना संधी देण्यात आली. मात्र या दोन्ही मालिकेत केएस भरत फ्लॉप ठरला, त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यातून त्याला डच्चू देण्यात येणार आहे. ऋषभ पंतच्या जागेवर केएस भरतला खेळण्याची संधी देण्यात आली होती पण त्याला या संधीचं सोन करता आलं नाही. केएस भरतची खेळी पाहिली तर पहिल्या मालिकेत तो 8 रन्स बनवून पवेलियनमध्ये परतला. दुसऱ्या डावात केएस भरतकडून भारतीय संघाला मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र त्याने 6 धावा करून आपली विकेट गमावली. तर कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात केएस भरतच्या बॅटने 23 नाबाद धावा केल्या मात्र त्याचा फारसा फायदा संघाला झाला नाही.
आतापर्यंतची केएस भरतची खेळीबद्दल बोलायचं झालं तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 86 सामन्यांमध्ये 37.95 च्या सरासरीनुसार त्यांने 4707 धावा ठोकल्या आहेत. या त्याने 9 शतके आणि 27 अर्धशतके झळकावली आहेत.
इंदूरमधील मालिकेत केएस भरत याचा जागेवर इशान किशन याला संधी मिळू शकते. इशान किशनला आतापर्यंत एकही कसोटी सामना खेळला नाही. त्यामुळे केएस भरतच्या जागेवर तिसऱ्या कसोटीमध्ये इशान खेळवलं जाऊ शकतं. इशानच्या खेळाबद्दल बोलायचं झालं तर वनडे आणि टी-20 मध्ये त्याने उत्तम कामगिरी केली आहे.

Exit mobile version