Home गंगाखेड गंगाखेडात भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा

गंगाखेडात भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा

193
0

गंगाखेड/ भारतीय संविधान दिना निमित्त महामानव विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाक्रती पुतळ्यासमोर सामुहीक बुध्द वंदना, भारतीय संविधानाच्या उद्देशिकाचे सामुहीक वाचन व महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

आयु.सिध्दोधन शंकरराव सावंत,सौ रसिकाताई सिध्दोधन सावंत व सावंत परिवार यांच्या वतीने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस व पुर्णाक्रती पुतळ्यास पुष्प/पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आयु.नवनाथ साळवे (बौध्दाचार्य) यांनी सामुहीक त्रीशरण,पंचशील,बुध्द वंदना व भारतीय संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन करण्यात आले.आयु.सिध्दोधन सावंत यांची कन्या कु.प्रणाली सावंत या बालिकेचा वाढदिवस असल्यामुळे उपस्थितीतांनी या बालिकेस वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी आयु.सतिशभाऊ घोबाळे, रामराव सावंत,आर.जी.मस्के,लक्ष्मण व्हावळे सर,बाळासाहेब जंगले, राहुल गायकवाड, विजय साळवे, जगन्नाथ सावंत, राजाचंद्रसेन जंगले, उमाकांत हेंडगे, बाळासाहेब जोगदंड, दिपक साळवे, बबनराव साबळे, सौ.सुर्यवंशी ताई,कु.जोगदंड ताई,प्रणाली सावंत, प्रांजल सावंत, शुभम सावंत आदी सह इतर उपासक-उपासिका, बालक, बालिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here