Marathwada Sathi

जुनी पेन्शनमुळे प्रशासनाच्या टेंशनमध्ये वाढ

नागपूर : जुनी पेन्शनसह विविध मागण्यांवरून कर्मचारी चार दिवसापासून संपावर आहेत. यामुळे कार्यालये ओस पडली आहे. कर्मचारी संपावर कायम असून त्यांच्यात अधिक जोश आला आहे. मार्च संपायला काहीच दिवस असल्याने कामे आटोपण्याचे टेंशन प्रशासनाला आले.संपाचा आज चौथा दिवस होता. काही कार्यालयात तीन ते चार टक्के कर्मचारी असून काही कार्यालये ओस पडली होती. फक्त अधिकारी कक्षात बसून आहेत. त्यांच्या हातीखाली कामे करणारे कुणीच नसल्याने ते ही अर्धा वेळ हातावर हात ठेवून बसून असल्याचे चित्र होते. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शासनाचे मोठे नुकसान होत आहे.कार्यालये ओस, कर्मचाऱ्यांमध्ये जोशसेवा ठप्प असल्याने नागरिकांनाही मनस्ताप सहन होत आहे. हा आर्थिक वर्षाचा अखेरचा महिना आहे. त्यामुळे कामे आटोपण्याची घाई प्रशासनाला आहे. कामपूर्ण न झाल्यास आणि फायलीला मंजुरी न मिळाल्यास निधी परत जाण्याची भीती आहे. निधी अखर्चित राहिल्यास त्याचे खापर अधिकाऱ्यांवर येणार आहे. त्यामुळे प्रशासनाला टेंशन आले आहे. कामात सहभाग घेण्यासाठी प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांची मनधरणी करण्यात येत आहे. परंतु कर्मचारी संपावर ठाम आहे. त्यामुळे प्रशासनाला घाम फुटला आहे.बीडीएस अडकलेले काम करण्यासाठी कर्मचारीच कार्यालयात नाही. निधी बीडीएसवर टाकल्याशिवाय त्याचा वापर करता येत नाही. बीडीएसचा कालावधी निश्चित आहे. या काळात निधीचा वापर न झाल्यास तो लॅप्स होतो. त्यामुळे पुन्हा नव्याने प्रक्रिया करावी लागते. काही विभागाच्या बीडीएस प्रणाली अधिकाऱ्यांना हाताळता येतात. परंतु काही विभागाच्या निधीचे बीडीएस संबंधित कर्मचाऱ्याला माहिती आहे. त्यामुळे अशा प्रकरणात अधिकाऱ्यांची चांगलीच गोची होत आहे.

Exit mobile version