Home मुंबई शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ अख्खे ‘बॉलिवुड’ मैदानात…!

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ अख्खे ‘बॉलिवुड’ मैदानात…!

638
0

मराठवाडा साथी न्यूज

दिलजितसिंगने दिले एक कोटी रुपये

मुंबई : शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वेगवेगळ्या राजकीय आणि सामाजिक संघटनांनी आणि संस्थांनी पाठिंबा दिला आहे. आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ अख्खे बॉलिवुड मैदानात उतरले आहे. त्यांना थंडीत आपल्या मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या अन्न सैनिकांची काळजी वाटते आहे, असे त्यांनी वेगवेगळ्या सोशल मिडियातून या आंदोलनाच्या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि प्रियांका चोप्रा यांनीही आता नवीन कृषी कायद्याचा विरोघ करणाऱ्या शेतकऱ्यांना सोशल मीडियातून पाठिंबा दिला आहे.
दिलजीत दोसांज, हरभजन मान, जसबीर जस्सी, रितेश देशमुख, सिनेदिग्दर्शक हंसल मेहता आणि इतर अनेक नामवंतांनी यापूर्वीच शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. दिलजीतने शेतकऱ्यांच्यामध्ये जाऊन एकजूटीने लढण्याचा संदेश ट्विटरवरून शेअर केला होता. याच ट्वीटला उत्तर देताना प्रियांकाने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लवकर लक्ष दिले पाहिजे असे ट्वीटही केले आहे.

प्रियांकाने ट्वीट करत म्हटले की, ‘आमचे शेतकरी भारताचे अन्न सैनिक आहेत. त्यांची भीती कमी करण्याची गरज आहे. त्यांच्या अपेक्षांची पूर्तता होणे आवश्यक आहे. एक मजबूत लोकशाही म्हणून आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की लवकरात लवकर हे संकट दूर होईल.’ ट्विटरवर अभिनेत्री कंगना रणौतच्या ट्वीटला जशास तसे उत्तर देणाऱ्या दिलजीतने शेतकरी आंदोलनाला १ कोटी रुपयांची देणगी दिली. नंतर दोसांजने ट्वीट करून शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा दर्शवला. अभिनेत्री सोनम कपूर हिने शेतकऱ्यांना ‘मानवी संस्कृतीचे संस्थापक’ म्हटले आहे. त्यांनी ट्वीट केले की, ‘सर्वातआधी नांगर सुरू झाले, त्यानंतर इतर कलांचा विकास झाला. म्हणूनच शेतकरी हे मानवी संस्कृतीचे संस्थापक आहेत.’

अभिनेत्री प्रीती झिंटाने शेतकऱ्यांना सैनिक म्हणत त्यांच्या आंदोलनाला समर्थन दिले आहे. प्रीतीने ट्वीट करत म्हटले की, ‘या कडाक्याच्या थंडीत आणि करोना महामारीमध्ये आंदोलन करणारे शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय पाहून माझ्या जीवाचे पाणी होते. ते आपला देश चालवणारे मातीचे सैनिक आहेत. शेतकरी आणि सरकार यांच्यात सुसंवाद होईल अशी मला मनापासून आशा आहे. लवकरच सकारात्मक निर्णय निघेल आणि सर्वांचे समाधान होईल.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here