Marathwada Sathi

दुसऱ्या टप्प्यात मोदींसह सर्व मुख्यमंत्री घेणार लस…!

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोना व्हायरस लसीकरणाची मोहीम सुरू झाली असून याचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे.या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबतच देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लस देण्यात येणार आहे.पहिल्या टप्प्यात देशभरातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात असून दुसऱ्या टप्प्यात नेतेमंडळींना लस देण्यात येईल.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत अशी माहिती दिली आहे की,पुढील टप्प्यामध्ये ५० वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या नेतेमंडळींचा समावेश असेल.आरोग्यसेवा देणारे कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स अर्थात पोलीस, महानगरपालिका कर्मचारी यांच्यानंतर लसीकरण होणारी तिसरी श्रेणी ५० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील असेल. त्यानंतरच्या ५० वर्षांखालील लोक असण्याची शक्यता आहे.

दरम्यान,सरकारने याअगोदरच स्पष्ट केले होते की,लसीकरणाची मोहीम वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये राबवण्यात येणार असून यामध्ये पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा देखील समावेश आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार लोकसभेत ३०० पेक्षा जास्त आणि राज्यसभेत जवळपास २०० खासदारांचे वय ५० पेक्षा जास्त आहे.

Exit mobile version