Marathwada Sathi

गेल्या पंधरा दिवसात नाथसागराच्या पाणीपातळीत केवळ ०.७३% टक्के वाढ

बाष्पीभवन रोखण्यासह पाणी चोरांचाही बंदोबस्त करण्याची गरज

पैठण : अवघ्या मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी नाथसागरात गेल्या १ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट अशा जवळपास वीस दिवसात पाणीपातळी केवळ ०.७३ टक्क्यांनी वाढली आहे. सर्वाधिक टक्केवारी ९ आणि १० ऑगस्टला होती. ९ ऑगस्ट रोजी ही टक्केवारी ४०.९४% होती. तीच टक्केवारी आज मितीला केवळ ४०.६३ टक्के आहे. अर्थात २ ऑगस्ट रोजी तीच टक्का ३९.९० टक्के होती. त्यानंतर तो जलपातळीचा आलेख अत्यंत बिकट अवस्थेत घसरत गेला. जो की ५० % पर्यंत ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही उच्च पातळीवर गेला नाही. जायकवाडीचा डावा कालवा, उजवा कालवा, विद्युत निर्मिती केंद्र अर्थात हायड्रो प्रकल्प आणि गोदा पात्र या चारही बाजूने पाण्याचा विसर्ग शुन्यात आहे तरीही जी पाणी पातळी ९ आणि १० ऑगस्ट ला ४० .९४ % होती तीच आज २० ऑगस्ट रोजी गुरुवारी केवळ ०.७३ टक्के वाढली आहे जवळपास जालना पाणी पुरवठा आणि औरंगाबाद पाणी पुरवठा तसेच वाळुंज औद्योगिक वसाहत या तीन ही ठिकाणी जे पाणी पुरवठा केला जात आहे तो फक्त पंधरा दिवसात एका टक्क्यांनी पाणी वजा करत आहे हे शासकीय पातळीवर रोखले पाहिजे असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. नाथसागरात आजपर्यंत ज्या क्युसेक्स ने पाण्याची आवक झाली ती अत्याल्प आहे.दिनांक २ ऑगस्ट ला ३९.९० % तर दि.३ ला ४० .१८% दि.४ ला ४० .२८ दि.५ ४०.३५ दि. ६ ला ४०.४५ दि.७ ला ४० .६६दि ८ ला ४० .८० तर दि ९ क्रांती दिनी काही क्रांती झाली असे वाटले परंतु ती पातळी पन्नाशी गाठू शकली नाही ती केवळ ४० .९४ % पर्यंतच मजल मारली. ती पातळी दोन दिवस स्थिर राहीली ते म्हणजे९ आणि १० ला ४० .९४ % जलसाठा उपलब्ध झाला होता तो दि.१२ तारखेला ४० ७७% वर आले आणि १३ -१४ ला ४० .५२ % राहिले तर दि.१८ ४० .५६ टक्के राहीली ती पातळी१९ तारखे पर्यंत फक्त शुन्य दशांस सात ने वाढले आता थेट सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाने जर मराठवाड्यावर कृपा केली तर काही सांगता येत नाही की अचानक काही जादू घडून नाथसागरात जल साठा वाढु शकतो.आज धरण ४० .६३ % वर आहे हे पाणी अत्यंत निगराणीत वापरावे लागेल असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. नाथसागरात फुगवटा परिसरात प्रचंड प्रमाणात पाणी चोरी होते आणि बाष्पीभवन ही फार मोठ्या प्रमाणात होत आहे हे बाष्पीभवन वाचवण्यासाठी पाण्यावर तेलयुक्त तवंग पसरवून पाणी वाचवा अशी मागणी केली जात आहे.

Exit mobile version