Marathwada Sathi

गेल्या २४ तासांत पावणे तीन लाख कोरोनाबाधितांची भर, १६०० वर मृत्यू

नवी दिल्ली : करोना संक्रमण वाऱ्यासारखा वेगाने पसरत असून देशात पुन्हा कडक लॉकडाऊन होणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी लॉकडाऊनच्या चर्चाना पूर्णविराम दिल्याने आता सर्व निर्बंधांबाबत जबाबदारी राज्य सरकारवर आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या चोवीस तासात (रविवारी) एकूण २ लाख ७३ हजार ८१० कोरोनाबाधित रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तर १ हजार ६१९ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. १ लाख ४४ हजार १७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ५० लाख ६१ हजार ९१९ वर पोहोचली आहे. आतापर्यंत देशात एकूण १ लाख ७८ हजार ७६९ नागरिकांना करोनामुळे जीव गमाववा लागला आहे. आजघडीला देशात १९ लाख २९ हजार ३२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

रविवारची आकडेवारी
देशात एकूण २ लाख ७३ हजार ८१० कोरोनाबाधितांची भर
देशात १ हजार ६१९ करोनाबाधितांचा मृत्यू
१ लाख ४४ हजार १७८ रुग्णांनी कोरोनावर केली मात

आतापर्यंतची आकडेवारी
एकूण कोरोनाबाधितांची संख्या : १ कोटी ५० लाख ६१ हजार ९१९
बरे झालेले रुग्ण : १ कोटी २९ लाख ५३ हजार ८२१
सध्या उपचार घेणारे रुग्ण : १९ लाख २९ हजार ३२९
आतापर्यंतचे एकूण मृत्यू : १ लाख ७८ हजार ७६९

Exit mobile version