Home महाराष्ट्र आदेश झुगारून मनसेने दहीहंडी फोडली; नांदगावकरांसह मनसैनिकांची पोलिसांकडून धरपकड

आदेश झुगारून मनसेने दहीहंडी फोडली; नांदगावकरांसह मनसैनिकांची पोलिसांकडून धरपकड

3031
0

राज्य सरकारने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवरसार्वजनिक सण-उत्सव साजरा करण्यास मनाई केली आहे. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मनाई आदेश झुगारून दहीहंडी साजरी केली. (The state government has banned public celebrations in the wake of the Corona crisis. However, Maharashtra Navnirman Sena (MNS) celebrated Dahihandi despite the ban.)

मुंबई : राज्य सरकारने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवरसार्वजनिक सण-उत्सव साजरा करण्यास मनाई केली आहे. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मनाई आदेश झुगारून दहीहंडी साजरी केली. मुंबईसह ठाण्यात मनसैनिकांनी दहीहंडी जल्लोषात साजरी केली. मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह मुंबई आणि ठाण्यात दहीहंडी साजरी करणाऱ्या मनसेसैनिकांची पोलिसांनी धरपकड सुरु केली आहे. त्यांच्यावर नौपाडा पोलिसांनी गुन्हे देखील दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले. (MNS leader Bala Nandgaonkar along with MNS soldiers celebrating Dahihandi in Mumbai and Thane have been arrested by the police.)

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दहीहंडी फोडणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार दादरमध्ये आज पहाटेच मनसेने दहीहंडी फोडून जल्लोष साजरा केला. मानखुर्दमध्येही मनसेने दहीहंडी उत्सव साजरा केला. मनसेचे राज्य उपाध्यक्ष महेश जाधव हे यात सहभागी होते. या कार्यक्रमाचे आयोजन विभाग अध्यक्ष रवी गवस यांनी केले. वरळीनाका, मुलुंड आणि मलबार हिल या भागातही मनसेने दहीहंडी फोडून उत्सव साजरा केला.

बाळा नांदगावकरांनी फोडली दहीहंडी
मनसे नेते बाळा नांदगावकर सकाळीच काळाचौकी मैदानात आले आहेत. या ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार असून मैदानात मनसे सैनिक मोठ्या प्रमाणावर जमले आहेत. तर, पोलिसांनी कितीही नोटिसा पाठवल्या तरी आम्ही दहीहंडी उत्सव साजरी करणारच, असा निर्धार नांदगावकर यांनी व्यक्त केला होता. तसेच उत्सव साजरा करू द्या नाही तर आम्ही ठिय्या आंदोलन करू, असा इशाराही दिला होता. त्यानंतर नांदगावकर यांनी स्वत: दहीहंडी फोडत हा उत्सव साजरा केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

पोलिसांकडून धरपकड
ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दहीहंडी फोडली. मनसे विद्यार्थी सेनेने वर्तकनगर, लक्ष्मी पार्क येथे दहीहंडी उभारत चार थराची हंडी फोडली. गोविंदांनी कोरोनाचे निर्बंध झुगारत हंडी फोडून मनसेचा झेंडा फडकविला. तर मनसेने नौपाडा येथील कार्यालयासमोर एक थराची हंडी फोडली. मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी देखील दहीहंडी फोडली. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पूजाअर्चा करत मनसेच्या कार्यालयासमोर उभारण्यात आलेली दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखले मात्र रितीरिवाजाप्रमाणे कमी उंचीची दहीहंडी बांधून ती फोडण्यात आली. जमावबंदीचे आदेश झुगारून मनसेसैनिकांनी घोषणा देतच दहीहंडी फोडली. त्यामुळे पोलिसांनी मनसे सैनिकांची धरपकड केली. मनसे नेते अविनाश जाधव आणि अभिजीत पानसे यांनी पोलिसांना दहीहंडी शांततेत साजरी करू द्यावी म्हणून विनवणी करत होते. मात्र, पोलिसांनी घोषणा देणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे या परिसरात मोठा जमाव जमला होता. या कार्यकर्त्यांवर नौपाडा पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याचं सूत्रांनी सांगितले.

बाकी सर्व चालतं पण सण साजरे करण्यास बंदी?
मनसे हे जे ठरवते ते करते. आम्हाला अनेक ठिकाणवरून फोन आले. उत्तर प्रदेशवरून देखील फोन आले. बाळासाहेबानंतर हिंदूंबाबत कोणी भूमिका घेतली असेल तर ती राज ठाकरे यांनी घेतली आहे. आम्हाला सण साजरा करण्यासाठी बंदी का ? बाकी इतर कार्यक्रम होतात, पण सण का होऊ देत नाही? असा सवाल अविनाश जाधव यांनी केला. आम्ही आमचे काम करणार. पोलिसांनी त्यांचे काम करावे. आता देखील काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, असं त्यांनी सांगितलं.

भगवती मैदानात दाखल
ठाण्यातील भगवती मैदानात मनसेकडून सार्वजनिक दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी मनसे सैनिक भगवती मैदानात जमले आहेत. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मनसे सैनिकांना तेथून हुसकावून लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या ठिकाणी दहीहंडी साजरी होणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here