Home देश-विदेश महाभियोग प्रस्ताव मंजूर …….

महाभियोग प्रस्ताव मंजूर …….

241
0
President Donald Trump talks with reporters before departing for France on the South Lawn of the White House, Friday, Nov. 9, 2018, in Washington. (AP Photo/Evan Vucci)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर

न्यूयॉर्क : डेमोक्रॅटिक-नियंत्रित प्रतिनिधीगृहात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरूद्ध महाभियोग प्रस्ताव पारित करण्यात आला. महाभियोगाचा प्रस्ताव १९७ च्या विरोधात २३२ मतांनी संमत झाला. १० रिपब्लिकन खासदारांनी महाभियोगाच्या बाजूने मतदान केले. आता हा प्रस्ताव १९ जानेवारीला सिनेटमध्ये आणला जाईल. अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राष्ट्राध्यक्षांवर दोनदा महाभियोग प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

“आम्हाला माहिती आहे की अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी देशाविरूद्ध सशस्त्र बंडखोरी करण्यासाठी चिथावणी दिली. त्यामुळे त्यांनी आपले पद सोडले पाहिजे. ते देशासाठी धोकादायक आहेत”, असे महाभियोगावरील चर्चेदरम्यान प्रतिनिधिगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पलोसी म्हणाल्या.अमेरिकी काँग्रेसमधील प्रतिनिधिगृहात कॅपिटॉल हिल येथील हिंसाचारप्रकरणी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्यात आली. या घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला होता. प्रतिनिधिगृहाने महाभियोगाची कारवाई सुरू करण्यापूर्वी उपाध्यक्ष माईक पेन्स यांना पंचविसाव्या घटना दुरुस्तीनुसार अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गच्छंती करण्यास सांगितले. याबाबतचा ठराव २२३ विरुद्ध २०५ मतांनी मंजूर झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here