Home आरोग्य मी कोरोना पॉझिटीव्ह…!

मी कोरोना पॉझिटीव्ह…!

367
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : संपूर्ण जगावर सध्या कोरोनाचे सावट आहे.अनेक कलाकारांना देखील या विषाणूचा संसर्ग झाला असून कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या सर्वच सेलिब्रिटींनी याची माहिती दिली.दरम्यान,अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिने देखील या संदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

रकुलने आपल्या पोस्ट मध्ये लिहिले आहे की,मी तुम्हा सर्वांनाच सांगू इच्छिते,माझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. मी सध्या विलगीकरणात असून, पूर्णपणे चांगली आहे. येते काही दिवस मी पूर्ण आराम करणार आहे. म्हणजे लवकरच मी चित्रीकरणाला जाऊ शकेन. रकुलने तिच्या संपर्कात आलेल्या सर्वांनाच कोरोना चाचणी करुन घेण्याची विनंती केली आहे. इतरांच्या सुरक्षिततेचाही विचार करत तिने ही पोस्ट केली आहे.

दरम्यान,रकुलने नुकतेच ‘मेडे’ या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली होती शूटिंग दरम्यानच तिला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले असून सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने या बातमीला दुजोरा दिला आहे.

https://www.instagram.com/p/CJF_7j_hom4/?utm_source=ig_web_copy_link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here