Home बीड वनविभागाच्या आशिर्वादाने डोंगरपट्यात होतेय “अवैद्य वृक्षतोड”

वनविभागाच्या आशिर्वादाने डोंगरपट्यात होतेय “अवैद्य वृक्षतोड”

* वनविभागाचे "अर्थपूर्ण" दुर्लक्ष. * व्यापारी व वन कर्मचारी यांची मिलीभगत

591
0

धारूर : धारुर वनपरिक्षेत्रा अंतर्गत डोंगरपट्यात सहा ते सात गावाच्या शिवारात मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड सुरू असून याकडे वनविभागाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे दरम्यान लाकूड व्यापारी व वन कर्मचारी यांची मिलीभगत असल्याचे परिसराततुन बोलले जात आहे परंतु या प्रकरणाने जंगलातील अनेक वृक्ष वाढण्याची गरज असताना वृक्ष तोडले जात असल्याने वृक्षप्रेमीतुन चिंता व्यक्त केली जात आहे.
शासन एकीकडे ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश देत वृक्ष लागवडीवर लाखो रुपयांचा खर्च करत आहे तर दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणेच्या कामचुकारपणा मुळे झाडांची सर्रास तोड होत असताना वनकर्मचारी मुग गिळून गप्प असुन याकडे डोळेझाक करत आहेत .पहाडी पारगाव परिसरातील धुनकवाड, पहाडी दहिफळ, ढगेवाडी, चारदरी,थेटेगव्हण या गावांच्या शिवारात डोंगराळ भाग अधिक असून या भागात वनविभागाची जमीन आधिक असल्याने वृक्षांचे प्रमाण जास्त आहे मात्र वन विभागाचे दुर्लक्ष असल्याने या भागात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे आंबा,लिंब,चिंच, बाभूळ डोंगराळ भागातील विविध जातीचे वृक्ष लाकूड व्यापारी सर्रास वृक्षतोड करीत असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे इतर ठिकाणी वृक्षतोड असताना वनविभागाच्या जमिनीवरही वृक्षतोड होत असल्याने नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे वन विभागाच्या वनरक्षकाची जबाबदारी असताना यांचे या प्रकाराकडे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. तर व्यापारी आणि वनरक्षकाची या प्रकरणात मिलीभगत असल्याचे नागरिकातून ऐकण्यास मिळत आहे यामुळेच कि काय? कुऱ्हाडबंदी आसतानही डोंगरपट्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याचे दिसून येत आहे या प्रकाराकडे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन होणारी वृक्षतोड थांबवावी अशी मागणी नागरिकासह वृक्षप्रेमीतुन होत आहे


  • कुऱ्हाड बंदीचे वाजले तीन तेरा *
    शासनाने वृक्षतोड थांबावी म्हणून कु-हाड

    बंदीचा कायदा काढला तरी देखील कुऱ्हाड बंदी असलेल्या चिंच,लिंब,आंबा यासारख्या झाडांचीही कत्तल केली जात आहे.डोंगरपट्यात अवैध वृक्षतोड होत असल्याने या कुऱ्हाड बंदी कायद्याचे मात्र ‘तीन तेरा वाजले’ आहेत विशेष बाब म्हणजे या प्रकाराकडे वनविभागाचे साफ दुर्लक्ष आहे.
    “””””””””””””””””””””””””””””””””””””””””””'”””””””””‘””‘””
  • दररोज दोन ते तीन ट्रक भरून जातात.
    पहाडी पारगाव येथील वनकर्मचारी व व्यापा-यांची मिलिभत असल्याने वृक्षतोड होत असुन यांच्या आशिर्वादाने ही वृक्षतोड खुलेआम चालु आहे. व्यापारी शेतकऱ्यांचे कवडीमोल भावात झाडे घेत असल्याने शेतकरी कंगाल अन् वनकर्मचारी व व्यापारी मालामाल अशी अवस्था झाली आहे दररोज दोन ते तीन ट्रक लाकुड भरून जात असल्याने वनकर्मचारी यांनी वाळवंट बनविण्याचा ‘ठेका’ घेतला की काय असा संतप्त सवाल वृक्षप्रेमीतुन केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here