Home इतर गुणांमध्ये बेकायदेशीररित्या वाढ…!

गुणांमध्ये बेकायदेशीररित्या वाढ…!

288
0

मराठवाडा साथी न्यूज

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठात विद्यार्थ्यांचे गुण बेकायदेशीररित्या वाढवल्याप्रकरणी विद्यापीठाच्या परीक्षा आणि मुल्यमापन मंडळाच्या तत्कालीन संचालकासह चार जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.सोलापुमधील एका फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत फेरफार करुन गुणांत वाढ करण्यात आली होती.यामध्ये कुलगुरुंच्या आयडीचा वापर करत गुण वाढविल्याचा आरोप करण्यात आला. विद्यापीठाकडून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सत्यशोधन कमिटी देखील गठीत केली होती. या कमिटीच्या अहवालातून कुलगुरुंच्या नावाने बनावट आयडी आणि पासवर्ड तयार केल्याचे समोर आले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांचे गुण हे बेकायदेशीररित्या वाढवल्याप्रकरणी विद्यापीठातर्फे २५ डिसें.२०१९ रोजी फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.संपूर्ण प्रकरण तांत्रिक असल्यामुळे यासंबंधित तपास पोलीस आयुक्तालयाचे सायबर पोलिस करत होते.या तपासादरम्यान चौघांविरुद्ध पुरावे आढळले आहेत.

दरम्यान,तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास करत पोलीस निरीक्षक बजंरग साळुंखे यांच्या पथकाने पुरावे गोळा केले. यामध्ये परीक्षा आणि मुल्यमापन मंडळाचे तत्कालीन संचालक श्रींकात कोकरे,तत्कालीन यंत्रणा विश्लेषक प्रशांत चोरमले, ई-सुविधा समन्वयक हसन शेख, प्रोग्रामर प्रवीण गायकवाड या चौघांना जवळपास एक वर्षांनंतर अटक करण्यात आली.अटक केलेल्या चारही आरोपींना न्यायलयासमोर हजर केले असता त्यांना २२ जाने.पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here