Home औरंगाबाद मी राजीनामा देणार नाही …

मी राजीनामा देणार नाही …

42
0


मराठवाडा साथी न्यूज
औरंगाबाद: “मी राजीनामा देण्यासाठी दिल्लीला गेलो नव्हतो, दर महिन्याचे काही विषय असतात त्यावर चर्चा करण्यासाठी मी दिल्लीला गेलो होतो. परंतु, ही बातमी मलाही दिल्लीला समजली. ज्यावेळी निवडणूक झाली, मंत्रिमंडळाचं गठन झालं. त्यावेळीच मी दिल्लीमध्ये जाऊन सांगितलं होतं की, मी प्रदेशाध्यक्ष आहे, महसुल मंत्री आहे, विधिमंडळ काँग्रेसचा नेताही आहे. माझ्याकडे यासर्व जबाबदाऱ्या आहेत. मी उत्तमरित्या सांभाळीन, परंतु, तुम्हाला कधी वाटलं की, यापैकी काही जबाबदाऱ्या इतर कोणाकडे सोपवायच्या आहेत, तर माझी त्याला हरकत नाही.

ऑक्टोबर महिन्यातही काही चर्चा सुरु झाल्या त्यावेळी मी स्वतःहून सांगितलं होतं की, तुम्हाला जर जबाबदाऱ्यांचं विभाजन करायचं असेल तर माझी हरकत नाही. कारण माझ्या एकट्या कडेच सर्व जबाबदाऱ्या आहेत. त्या मी समर्थपणे सांभाळतोय, पण जरी काही वाटलं तर जबाबदाऱ्यांचं विभाजन करण्यास माझी हरकत नाही.”असं वक्तव्य थोरात यांनी केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here