Marathwada Sathi

‘मला तू खूप आवडते’…!

मराठवाडा साथी न्यूज

रायगड : छत्तीसगडमधील रायगड येथील एका स्टोअर संचालकाला एक तरुणी इतकी आवडली की त्याने तरुणीच्या मोबाइलवर फोन करुन आपल्या प्रेमाची कबुली देखील दिली.मात्र,आश्चर्यकारक बाब म्हणजे जो व्यक्ती तरुणीला त्रास देत होता तो, विवाहित असून दोन मुलांचा बाप होता.तरुणीने अगोदर त्याला समजावले,मात्र तरीही तो सतत तिला मेसेज पाठवित होता. शेवटी वैतागलेल्या तरुणीने त्याला धडा शिकवला.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संदीप अग्रवाल(वय ३५)‘डभरा रोड’ स्थित एक दुकान चालवितात.संदीप वर आरोप आहे की,गेल्या दिवसांपासून सातत्याने ते एका २२ वर्षीय तरुणीच्या मोबाइलवर मेसेज पाठवीत आहेत.आरोपी संदीपने तिला मेसेज करुन लिहिले आहे की, तुम्ही खूप सुंदर दिसता. मला तुमच्यासोबत मैत्री करायची आहे. तरुणीने त्याला त्याच्या वयाची आठवण करुन दिली व थोडीतरी लाज बाळगण्यास सांगितले.मात्र,अनेकदा नकार दिल्यानंतरही संदीप ऐकत नव्हता.त्यामुळे शेवटी तरुणीच्या सूचनेवर संदीप विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या संदर्भात पोलिसांनी सांगितले आहे की, ते या प्रकरणाचा तपास करीत असून आरोपी विरोधात कडक कारवाई करण्यात येईल.

Exit mobile version