Marathwada Sathi

ड्रेस घेण्यासाठीही माझ्याकडे पैसे नव्हते…..

कंगनाने शेअर केली आठवण

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत कायमच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येत असते. आता मात्र कंगना कोणत्याही वादग्रस्त वक्तव्यामुळे नव्हे तर तिच्या भावूक पोस्टमुळे चर्चेत आली आहे.अलिकडेच कंगनाने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिला मिळालेल्या पहिल्या राष्ट्रीय पुरस्काराची आठवण शेअर केला आहे. विशेष म्हणजे या पुरस्कार सोहळ्याला जाण्यासाठी तिच्याकडे योग्य कपडेदेखील नसल्याचे तिने म्हटले आहे.

“पहिला राष्ट्रीय पुरस्कार. या पुरस्कार सोहळ्याशी जोडलेल्या अनेक आठवणी आहेत. कमी वयात हा पुरस्कार मिळणारी अभिनेत्रींपैकी मी एक होते. एका स्त्री केंद्रित चित्रपटासाठी महिला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणं ही फार मोठी गोष्टी आहे. हा ड्रेस मी स्वत: डिझाइन केला आहे. त्यावेळी एक नवीन ड्रेस घेण्याइतपत पैसेदेखील माझ्याकडे नव्हते. हा ड्रेस खरंच इतका वाईट दिसत नाहीये ना, हो ना?,” असं म्हणत कंगनाने ही पोस्ट शेअर केली आहे.

Exit mobile version