Marathwada Sathi

मी धनंजय पंडीतराव मुंडे… मंत्रीपदाची वर्षपूर्ती!

दत्तात्रय काळे । 9607072505

मी धनंजय पंडीतराव मुंडे… ईश्वर साक्ष शपथ घेतो की, महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारत आणले जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल तर खेरिज करून मी कोणत्याही व्यक्तींना अथवा व्यक्तीला मी कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही…..

हि वाक्ये आहेत महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे. आजपासून बरोबर १ वर्षापूर्वी याच तारखेला म्हणजेच ३० डिसेंबर २०१९ रोजी त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून शपथ घेतली. जनतेतून झालेल्या प्रत्यक्ष विधानसभा निवडणूकीत ते पहिल्यांदाच मोठ्या मताधिक्याने परळी मतदारसंघातून निवडूण आले आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना मंत्री म्हणून लागलीच संधीही मिळाली.

ना.धनंजय मुंडे यांना याअगोदरच्या काळात महाराष्ट्राचा सर्वाधिक लोकप्रिय आणि सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून सर्वांनी पाहिले होते. मागील भाजपा सरकारला त्यांनी विरोधी पक्षनेता असतांना अनेक प्रश्नांवर धारेवर धरत सळो की पळो करून सोडले होते. विरोधी पक्षनेता म्हणून संपूर्ण पाच वर्षांचा काळ त्यांनी आपल्या कर्तृत्वावर गाजवला. २०१९ साली झालेल्या निवडणूकीत सत्ताधारी भाजपाला डावलून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस अशा तीन पक्षांनी महाराष्ट्रात प्रथमच महाविकास आघाडी स्थापन केली. या घाडीचे शिल्पकार होते देशाचे माजी कृषीमंत्री खा.शरद पवार.

ना.धनंजय मुंडे यांची महाराष्ट्राच्या राजकारणावर असलेली पकड आणि तरूणाईमध्ये असलेली क्रेझ खा.शरद पवारांनी लक्षात घेतली. त्याचबरोबर ना.मुंडे यांच्या कामाचा आवाकाही मागील पाच वर्षांच्या काळात खूप वाढलेला त्यांनी पाहीला. मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळात महत्वाच्या असलेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रीपदाचा कार्यभार त्यांना देण्यात आला. पुरोगामी विचारांना घेवून समाजाच्या अतिविशेष घटकांना न्याय देण्याची आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची महत्वपूर्ण जबाबदारी खा.शरद पवार यांनी त्यांच्यावर टाकली. जबाबदारी खांद्यावर पडताच ना.धनंजय मुंडे यांनी आपल्या संकल्पनेतून अनेक विकासाच्या कामांना मूर्त स्वरूप देण्याचा धडाका लावला. महाराष्ट्राच्या ईतिहासात प्रथम त्यांनी मासिक कार्यअहवाल सादर करण्याची प्रथा पाडली.

सामाजिक न्याय खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्रातील मागसवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचे, बार्टीच्या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणासाठी पुरक असे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. गेल्या वर्षाभरात त्यांनी केलेल्या कामांची यादी खूप मोठी आहे. बारा महिन्यांच्या मागील काळात त्यांच्या कामाचे १२ कार्य अहवाल त्यांनी खा.शरद पवार यांच्याकडे सादर केले आहेत. म्हणजेच त्यांच्या कामाची व्याप्ती आणि आवाका किती मोठा असेल याची प्रचिती येते. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी बीड जिल्ह्याला आणि जिल्ह्यातील जनतेला अगदी पालकाप्रमाणे सावरले. कोरोनाच्या उपचारासाठी अद्ययावत यंत्रणा उभी करणे, स्वॅब टेस्टींगसाठी प्रयोगशाळा जिल्ह्याला खेचून आणणे, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रूग्णालयाला अद्ययावत अशी वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध करून देणे अशी हजारो कोटींची अनेक कामे त्यांनी घडवून आणली. याच काळात ते न थकता जनतेसाठी अहोरात्र राबत होते, त्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यावर काही दिवस मुंबई येथे उपचार घेवून लगेच त्यांनी स्वत:ला जनतेच्या कामात झोकून दिले. बीड जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी त्यांनी मागील वर्षभरात केलेले काम लक्षात ठेवण्याजोगे आणि वाखाणण्याजोगे आहे. पुढील चार वर्षांतही त्यांच्या हातून अशीच विधायक कामे अविरतपणे सुरूच राहतील याचा बीड जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण महराष्ट्रालाही विश्वास वाटतो.

Exit mobile version