Marathwada Sathi

पगार किती आणि बोलतो किती …!


मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा फेकूचंद असा उल्लेख शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. गोपीचंद पडळकर यांनी ‘संजय राऊत यांना आपला पगार किती बोलता किती?,’असा खोचक सवालही केला आहे.

‘गोपीचंद पडळकर यांनी पत्रात लिहलं आहे की, खरंतर मी आपणास शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असा उल्लेख करु शकलो असतो. परवाच्या सामना दैनिकाच्या अग्रलेखात आपण माझा उल्लेख फेकूचंद असा केला. त्या पद्धतीने आपला उल्लेख मलाही करता आला असता. पण ते माझे संस्कार आणि संस्कृती नाही. प्रत्येकाशी नम्रपणे बोलले पाहिजे.प्रत्येकाचा उल्लेख सन्मानाने केला पाहिजे हे संस्कार मला माझ्या आई वडिलांनी दिले आहेत,’ अशा शब्दांत पडळकरांनी राऊतांवर ट्विट वरून टीका केली आहे.

Exit mobile version