Home औरंगाबाद बेघर, गरजूंना मायेची ऊब, १८०० ब्लँकेटचे वाटप

बेघर, गरजूंना मायेची ऊब, १८०० ब्लँकेटचे वाटप

374
0

औरंगाबाद : सध्या सर्वत्र कडकीत थंडी जाणवत आहे. अशा वातावरणात गरजू, बेघर नागरिकांना तब्बल १ हजार ८०० ब्लँकेटचे वाटप करून मुंबईच्या ईशविश या सेवाभावी संस्थेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वाटप करून मायेची ऊब दिली. पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या उपस्थितीत शहरातील विविध भागात या ब्लँकेटचे वाटप शनिवारी करण्यात आले.

शहरात बेघर, रस्त्यावर जीवन व्यथित करणारे असंख्य लोक आहेत. त्यांना थंडीमुळे रात्र कुडकुडत काढण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे अशा गरजूंना थंडीत मायेची ऊब देण्यासाठी मुंबईस्थित ईशविश सेवाभावी संस्थेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ब्लँकेट वाटप करण्याचे नियोजन केले. शनिवारी पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या हस्ते शहरातील मोतीकारंजा आणि गांधीनगर भागातील मनपा बेघर निवारा केंद्रावरील नागरिक तसेच संग्रामनगर, क्रांती चौक, मोंढा नाका उड्डाणपूल, रेल्वेस्टेशन, पुंडलिकनगर भागात काम करणारे मनपा सफाई कामगार यांना १ हजार ८०० ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी अतुल शिनगारे, कमलेश खोब्रे, नितीन पवार, महेश नरवडे, गोकुळ दुर्घट आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here