Marathwada Sathi

“हिटमॅन ” Coming soon

मेलबर्न : टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा 30 डिसेंबरला भारतीय टीममध्ये सहभागी होणार आहे. रोहितला आयपीएल स्पर्धेदरम्यान दुखापत झाली होती. या दुखापतीमधून बरा झाल्यानंतर तो 16 डिसेंबरला सिडनीमध्ये दाखल झाला होता. रोहित सध्या सिडनीमध्ये दोन आठवड्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहे.

रोहितमुळे संघ होणार मजबूत :

भारताकडून पहिल्या टेस्टमध्ये पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल ही ओपनिंग जोडी मैदानात उतरली होती. पृथ्वी शॉ ने दोन्ही इनिंगमध्ये मिळून फक्त 4 रन काढले. तर मयंक अग्रवालही फार कमाल करु शकला नाही. त्याने पहिल्या इनिंगमध्ये 17 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 9 रन काढले होते. रोहित शर्माच्या समावेशानं भारतीय टीमच्या सलामीचा प्रश्न सुटणार असून त्याच्या अनुभवामुळे टीम इंडिया भक्कम होणार आहे. रोहितनं मागच्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये डावाची सुरुवात केली होती.

सिडनी टेस्ट कोरोनामुळे होऊ शकते रद्द :

सिडनीमध्ये कोरोना व्हायरसची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे सिडनीमध्ये होणारी तिसरी टेस्ट देखील मेलबर्नमध्ये होण्याची शक्यता आहे. मेलबर्नमध्ये दुसरी टेस्ट 26 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. तर सिडनीमध्ये 7 ते 11 जानेवारी दरम्यान तिसरी टेस्ट आहे. सिडनीमधील परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर तिथं तिसरी टेस्ट होण्याची शक्यता कमी आहे.

Exit mobile version