Home परभणी गंगाखेड शुगर कारखान्यास गाळपास परवानगी देण्याचे हायकोर्टाचे साखर आयुक्ताना आदेश

गंगाखेड शुगर कारखान्यास गाळपास परवानगी देण्याचे हायकोर्टाचे साखर आयुक्ताना आदेश

मा. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी साखर आयुक्तास गंगाखेड शुगर कारखान्यास गाळप परवानी देण्याचे दिल्याने आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या रस्त्यावरील संघर्षास यश आले असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

604
0

मराठवाडा साथी न्यूज

गंगाखेड: गंगाखेड शुगर कारखान्याने ऊस ऊत्पादक शेतकऱ्याचे पैसे एफआरसी नुसार अदा करून सुद्धा विलंब कालावधीचे 15% व्याजाची रक्कम,मुख्यमंञी सहाय्यता निधी व साखर संकुल निधी न भरणा गाळप परवानगी रद्द केली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी साखर आयुक्तास गंगाखेड शुगर कारखान्यास गाळप परवानी देण्याचे दिल्याने आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या रस्त्यावरील संघर्षास यश आले असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 गंगाखेड शुगरने 15 जुलै2020 चा परिपञकानूसार सन 2020-21 गाळप हंगामाकरिता गाळप परवाना प्रस्ताव प्रादेशिक सहसंचालक साखर नांदेड यांच्याकडे कडे पाठवून गाळपाची पूर्णपणे तयारी करीत बाँयलर पेटविण्यात आला प्रत्यक्षात गाळप सुरू झालेले आसताना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कारखान्याने विलंब कालावधीचे 15% व्याजाची रक्कम 5 कोटी 92 लाख 34644 मुख्यमंञी सहाय्यतान निधी 340 4477.60 व साखर संकुल निधी 450559.70 या रक्कमा 14 दिवसात भरणा करण्याचे आदेश देत गाळप परवाना रद्द केला होता.

सदरील प्रकरण औरंगाबाद हायकोर्टात सुरू होते.गंगाखेड शुगरला लावण्यात आलेले नियम महाराष्ट्रा तील इतर एकाही साखर कारखान्यास लावले नसल्याचा आरोप आ.डॉ.गुट्टे यांनी केला.गंगाखेड शुगर गाळपाची परवानगी रद्द करण्यामागे राजकीय षढयंञ आसल्याने थेट रस्त्यावर संघर्ष सुरू झाला तर गंगाखेड शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले.गंगाखेड शुगर गाळप परवाना रद्द झाल्याने जिल्हातील 30 हेक्टरवरील ऊसाचा प्रश्न निर्माण झाला होता.

जिल्हातील इतर कारखान्याने गाळप करून सुद्धा 7 लाख मे.टन ऊस शिल्लकच राहाणार आसल्याने ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार होती.आहे.औरंगाबाद हायकोर्टात सुरू आसलेल्या या प्रकरणात न्यायालयाने आज दि.३ रोजी गंगाखेड शुगर गाळप परवाना देण्याचे आदेश साखर आयुक्ताना देण्यात आल्याने अखेर सत्याचा विजय झाल्याचे प्रतिपादन डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here