Marathwada Sathi

‘हेल्थ अलर्ट’ जारी…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : मागच्या आठवड्यापासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.मात्र,कालपासून(११ जाने.)राज्यातील तापमानात मोठया प्रमाणात बदल होतांना दिसत आहे.मुंबई मध्ये सध्या कोरड्या वातावरणात आणि तापमानातही वाढ झाली आहे.फक्त एव्हढेच नाही तर मुंबईतील प्रदूषणाची पातळीही वाढली आहे. त्यामुळे मुंबईत ‘हेल्थ अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

सध्या मुंबईतील तापमान ३३ अंश सेल्सिअसवर पोहोचले असून हवेची गुणवत्ताही खालावली आहे.आज हवेचा गुणवत्ती निर्देशांक १७० इतका नोंदवला गेला आहे. सध्याचे वातावरण आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याने भौतिकशास्त्रज्ञ तसेच हवामान तज्ज्ञ प्राध्यापक किरणकुमार जोहरी यांनी मुंबईत ‘हेल्थ अलर्ट’ जारी केला आहे.

दरम्यान,दमा,अस्थमा, हृदयविकार, मधुमेह इत्यादी आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी हे वातावरण अधिक घातक असून लहान मुले,वृद्ध आणि गर्भवती स्त्रियांनी विशेष काळजी घ्यावी असेही जोहरी यांनी सांगितले.

Exit mobile version