Home मनोरंजन चाहत्यांसाठी त्याने केला स्टंट #ranveer

चाहत्यांसाठी त्याने केला स्टंट #ranveer

745
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : आपला अभिनय तसेच हटके अंदाजाने नेहमीच चाहत्यांच लक्ष वेधणाऱ्या बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग कायम या ना त्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी त्याच्या हटके लूकमुळे तर कधी तो करत असलेल्या स्टंटमुळे. सध्या सोशल मीडियावर रणवीरचा असाच एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने चाहत्यांना एक मोलाचा संदेश दिला आहे. मात्र, हा संदेश देताना त्याने जी शक्कल लढवली त्याची चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.सध्या सोशल मीडियावर रणवीरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गाडीच्या टपावर उभा राहिला आहे. नेहमीच जनजागृती मध्ये सेलिब्रिटींचा वापर होतो. तर अनेकदा सेलिब्रेटिंग कडून सामाजिक भान जपत जनजागृती केली जाते यावेळी रणवीर नि देखील चाहत्यांना सध्याच्या काळात स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. हात स्वच्छ धुवा, सॅनिटायझर लावा असं तो चाहत्यांना सांगत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here