Marathwada Sathi

घनदाट अंधारात प्रेयसीला भेटायला आला ,घरच्यांनी पकडलं , मार मार मारलं अन सकाळी त्यालाच जावई केलं

उत्तर प्रदेश : रात्रीच्या अंधारात प्रेयसीला भेटायला आला. त्याचवेळी घरच्यांनी त्याला पकडलं आणि रात्रभर एका खोलीत कोंडून जाम मारलं .ही घटना आहे उत्तर प्रदेशमधील मधील रामपूर या गावातील दुसऱ्या दिवशी या तरुणाला घरच्यांनी पोलिसांच्या हवाली केले. गुन्हा,कोर्ट कचेरी यापासून वाचण्यासाठी घरच्यांनी याच तरुणाशी तरुणीचा विवाह लावून दिला. आणि त्यालाच आपला जावई बनून घेतले.

हि घटना रामपूरच्या आजिमनगर परिसरातील मेहेंदीनगर सुमारी गावातील आहे. या ठिकाणी प्रेम सिंह नावाची प्रेयसी लक्ष्मी राहते हिलाच भेटण्यासाठी हा तरुण तिच्या घरी रात्री पोहचला. मात्र त्याचवेळी त्याला घरच्यांनी पकडले नंतर मात्र घरच्यांनी कोर्टाच्या चक्राच्या पडण्याच्या भेटीने त्यालाच आपला जावई बनवून घेतलं. या घटनेबद्दल अप्पर पोलीस निरीक्षक अरुण कुमार सिंह यांनी माहिती दिली. आजमगडच्या एका लहान मंदिरात या जोडप्याचे लग्न लावण्यात आले.

Exit mobile version