Home इतर हरीश रावत यांची केंद्राकडे मागणी…!

हरीश रावत यांची केंद्राकडे मागणी…!

238
0

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी ट्विट करत केंद्राकडे मागणी केली आहे की ,भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या ‘भारतरत्न’ने काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी आणि बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांचा सन्मान करावा. राजकारण आणि समाजकारणातील महिला शक्तीचा आदर करत सोनिया गांधी आणि मायावती यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, असे मत रावत यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान,रावत यांनी मायावतींना भारतरत्न देण्याची मागणी केली असली तरी रावत यांच्या या मागणीवर बसपा नेते के गौतम यांनी नाराजी व्यक्त केली आहे.ते म्हणाले की,‘हरिश रावत यांची मागणी फक्त जनतेला मुर्ख बनवण्याच्या रणनितीपेक्षा वेगळी नाही’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here