Home क्राइम संतापजनक !चॉकलेटच्या बहाण्याने केला चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार

संतापजनक !चॉकलेटच्या बहाण्याने केला चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार

789
0

मराठवाडा साथी न्यूज

पीडितेच्या कुटुंबियांकडून झालेल्या मारहाणीत आरोपीचा मृत्यू

कैमूर : माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना बिहार मध्ये घडली आहे.बिहारच्या कैमूरमध्ये एका चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची माहिती समोर आली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोपी सीपू कुमार ला पकडून मारहाण केली.मिळालेल्या माहितीनुसार तो पीडितेच्याघर शेजारीच राहात असून नळ योजनेत ऑपरेटरचे काम करीत होता.

घटनेतील दोन्ही पक्षांनी पोलिसात केली तक्रार दाखल

दोन्ही पक्षांद्वारे पोलीस ठाण्यात प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित कुटुंबाने आरोप केला आहे की,सिनू ने त्यांच्या ४ वर्षांच्या मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने पंचायत भवनमध्ये आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला.हि बाब पीडितेच्या कुटुंबाला कळताच त्यांनी आरोपीला मारहाण केली आणि या दरम्यानच त्याचा मृत्यू झाला.दरम्यान,पोलिसांनी मृत तरुणाच्या कुटुंबाच्या वक्तव्याच्या आधारावर मुलीच्या काकांना हत्येच्या आरोपात अटक करीत तुरुंगात रवानगी केली आहे. सध्या या प्रकरणातील तपास सुरू आहे.

दरम्यान,एसपी दिलनवाल अहमद यांनी सांगितले की, दोन्ही पक्षाकडून याबाबत तक्रार दाखल केली आहे. एका पक्षाने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तर दुसऱ्याने मारामारीत जीव घेतल्याची तक्रार दाखल केली आहे.पोलीस या प्रकारणाचा तपास कीरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here