Home क्रीडा KKR च्या खेळाडूंनी दिल्या किंग खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा

KKR च्या खेळाडूंनी दिल्या किंग खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा

57
0

दुबई : बॉलीवूडचा बादशाह आणि ipl मधील कोलकाता नाईट रायडर्स या संघाचा मालक शाहरुख खान आज ५५ वर्षाचा झाला. बॉलीवूड तसेच त्याच्या फॅन्सकडून त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला जात आहे. KKR च्या खेळाडूंनी शाहरुखशी जुळलेल्या काही आठवणी त्यांच्या ट्विटर पेजवर शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

सर्व क्रिकेटर्सनेही शाहरुखचे अभिनंदन केले आहे. दिनेश कार्तिक म्हणाला, ‘मला आठवते की मी एकदा बालीला गेलो होतो. तेथे एका ऑटो चालकाने मला दोन गोष्टी सांगितल्या – म्हणजे तुम्ही शाहरुख खान, प्रीती झिंटा, वीर-झारा, भारतातून आहात. आंद्रे रसेल म्हणाला , ‘हा एक विशेष क्षण होता. शाहरुख खूप सभ्य आणि शांत आहे. तो माझ्या जवळ उभा राहिला आणि मला मिठी मारली. मला लाज वाटत होती.

संघाचा कर्णधार इयन मॉर्गन म्हणाला, ‘प्रत्येकजण त्याला टॉम क्रूज ऑफ इंडिया म्हणतो. प्रत्यक्षात तो टॉम क्रूझपेक्षा अधिक मनोरंजक आहे. कुलदीप यादव म्हणाले, ‘तू हजार वर्षे जगशील.’ लकी फर्ग्युसन म्हणाला, ‘तुमचा दिवस चांगला जावो’.

तर पॅट कमिन्स म्हणाला , ‘तुम्ही अद्याप 21 वर्षांचे आहात असे दिसते. तर या वाढदिवसाचा आणि आगामी वाढदिवसाचा आनंद घ्या. शाहरुख सध्या युएईमध्ये आहे जेथे आयपीएल 2020 मध्ये तो आपल्या टीमला पाठिंबा देत आहे. कोलकाताने त्यांचे सर्व लीग सामने खेळले आहेत. तो 14 सामन्यांत 14 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. हा संघ अद्याप प्ले ऑफ शर्यतीत कायम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here