मराठवाडा साथी न्यूज
औरंगाबाद : ” क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या १३० व्या स्मृतिदिनानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने विनम्र अभिवादन “
स्त्री शिक्षणाचे आद्यक्रांतिकारक , थोर विचारवंत , बळीराजाला त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी त्यांच्यासाठी संघर्ष करणारे महात्मा जोतीराव फुले यांच्या १३० व्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंद्धेला रात्री १२ वाजता औरंगपुरा येथील फुले दांम्पत्य यांच्या पुतळ्याचे स्वच्छता करून व मेणबत्त्या पेटवून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष मनोज घोडके यांच्या उपस्थितीत या परिसरातील स्वच्छता व मेणबत्ती पेटवून अभिवादन प्रसंगीं प्रदेश प्रवक्ते प्रा. संतोष विरकर,शहर कार्याध्यक्ष गणेश काळे,पश्चिम शहराध्यक्ष चंद्रकांत पेहरकर, शहर उपाध्यक्ष विनायक पाराशर,,योगेश हेकाडे, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल विलास ढंगारे, बाळू सोनवणे, जनार्धन कापुरे आदींनी या महामानवास मानवंदना दिली व स्मृतिदिनाच्या दिवशी सकाळी अभिवादन करण्यासाठी माजी नगरसेविका किर्तीताई शिंदे,जिल्हा प्रसिध्दी प्रमुख संदीप घोडके,पुर्व शहराध्यक्ष अनिल क्षिरसागर, पश्चिम शहर संघटक राहूल निकम,साळूबा पांडव,नागेश हिवाळे, अर्जुम सोनवणे, गणेश हिवाळे, शिवाजी जाधव,प्रदीप गोरे,शशिकांत तिडके,महिला आघाडीच्या सुभद्राताई जाधव,अरुणाताई तिडके,अनिताताई देवतकर,सरस्वतीताई हरकळ विशाखा काळे आदींची उपस्थिती होती.
यावेळी महामानवास अभिवादन करतांना जय जोती, जय क्रांती, फुले शाहू आंबेडकरांचा विजय असो,अशा घोषणा देऊन अभिवादन करण्यात आले.