Marathwada Sathi

माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयात , महात्मा फुलेंना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

28 नोव्हेंबर – क्रातिबांचे स्मरण करण्याचा आजचा दिवस!

औरंगाबाद : महात्मा फुले , देशात सामाजिक क्रांतीची मशाल पेटविणारा पहिला योद्धा . या महापुरूषाला अभिवादन नतमस्तक होऊनच करावं लागतं. दलित, शोषित, पीडित तथा समस्त स्त्रियांच्या गुलामगिरी मुक्तीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत मशालीत तेल होऊन जळत राहिलेला सच्चा महात्मा क्रातिबांचे स्मरण करण्याचा आजचा दिवस.
महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. सी. एम. राव, उपप्राचार्य प्रा. श्रीकिशन मोरे, प्रा. डॉ शशिकांत शिरसाट, प्रा डॉ अपर्णा कोत्तापल्ले, प्रा.डॉ अमोल चव्हाण, प्रा अभय जाधव, प्रा. डॉ अंजु सिंग, ग्रंथपाल डॉ जगदीश व्यास, कार्यालय अधीक्षक जितेंद्र डांगरे आणि कर्मचारी वर्ग यांची उपस्थिती होती.

Exit mobile version