मराठवाडा साथी न्यूज
औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात झालेल्या निवडणूक मध्ये ६४ % पदवीधरांनी मतदारांनी मतदान केले. यामध्ये प्रामुख्याने मतदान करण्यासाठी 8 कोरोना ग्रस्त रुग्णांनी देखील मतदानाचा अधिकार बजावला हे विशेष. यावरून लोकशाहीचा हा उत्सव कोरोना रोखू शकला नाही असे चित्र निर्माण झाले होते.
१ डिसेंबर रोजी औरंगाबाद मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी महानगरपालिका आरोग्य यंत्रणा सुद्धा सज्ज होती. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज विविध मतदान केंद्रावर एकूण 253 मनपा आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती . यात 118 आरोग्य कर्मचारी, 22 आरोग्य अधिकारी उपस्थित होते. मतदान केंद्र निर्जंतुकीकरण करण्यासाठी मलेरिया विभागचे 113 कर्मचारी उपस्थिती होती.113 मलेरिया कर्मचारी यांनी मतदान केंद्र येथे निर्जंतुकीकरण केले होते. मलेरिया विभाग प्रमुख डॉ अर्चना राणे यांच्या नेतृत्वाखाली मलेरिया कर्मचाऱ्यांनी हे कर्तव्य पार पाडले.
मराठवाडा पदवीधर निवडणूक मध्ये 8 पदवीधर कोरोना रुग्णांनी मराठवाडा औरंगाबाद पदवीधर निवडणूकी साठी आपला हक्क बजावला.
यात अनुक्रमे सिपेट -1 ,एमआयटी -3 ,पदमपुरा कोविड सेंटर -1, पीईएस कोविड सेंटर -1 व किलेअर्क कोविड सेंटर येथून 1 असे 8 पदवीधर कोरोना रुग्णांणी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात किलेअर्क कोविड सेंटर येथील 1 रुग्ण हा गंगापूर येथील होता त्यास मतदानासाठी गंगापूर येथे नेण्यात आले. या सर्व मतदानाचे नियोजन आरोग्य अधिकारी डॉ तलत अझीझ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले . प्रोग्रॅम अधिकारी म्हणून डॉ अर्चना राणे ,डॉ पाथरीकर यांचा सहभाग यात होता. अशी माहिती आरोग्य विभाग यांच्या कडून प्राप्त झाली आहे.