Home औरंगाबाद गोविंदभाईंच्या स्मृतिदिनाचा स.भू. लाच विसर ?

गोविंदभाईंच्या स्मृतिदिनाचा स.भू. लाच विसर ?

166
0

कोविडचे कारण पुढे करीत केली सावरासावर

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनानी ‘गोविंदभाई श्रॉफ’ यांच्या पुण्यतिथीचा त्यांनी स्थापन केलेल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेलाच पडला विसर. कोणताही कार्यक्रम न घेता कोविडचे कारण पुढे करीत संस्थेने दुपारी बारानंतर केली सावरासावर. कारण ज्या संस्थेच्या कार्यकारीणीला गोविंदभाईंचे अस्तित्वच त्या ठिकाणी नको होते, त्यांना विसर पडणे स्वाभाविक असल्याची भावना संस्थेच्या सदस्यांनी दैनिक मराठवाडा साथीकडे व्यक्त केली.

दरवर्षी सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयातून गोविंदभाईंच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाची सुचना संस्थेतील सर्व शैक्षणिक अस्थापनांना दिली जाते. या वर्षी तशी सुचनाच दिली गेली नाही. शनिवारी (दि.२१) सकाळी संस्थेतील एका प्राध्यापकाच्या लक्षात ही बाब आली. त्यानंतर पळापळ सुरू झाली. संस्थेच्या विज्ञान महाविद्यालयाच्या समोरील स्मृतिस्थळाची साफसफाई केली. त्यानंतर संस्थेच्या हुशार पदाधिकाऱ्यांनी कोविडची आचार संहिता असल्याने कार्यक्रम घेतला नाही, असे सांगण्यास मध्यवर्ती कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सुचना दिल्या.

मराठवाड्याच्या विकासासाठी अवितरत लढणाऱ्या स्वातंत्र्य सैनानी गोविंदभाईंच्या स्मृतिदिनाचा विसर स. भु. संस्थेलाच पडावा, ही आर्श्चयाची गोष्ट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here