Marathwada Sathi

सरकारने रद्द केले ४.३९ कोटी रेशन कार्ड

नवी दिल्ली : अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने एनएफएएसए अंतर्गत योग्य लाभार्थ्यांची ओळख करण्यासाठी २०१३ पासूनचे ४.३९ कोटी बनावट रेशन कार्ड रद्द केले आहेत. रद्द केलेल्या रेशन कार्डच्या बदल्याद योग्य लाभार्थी किंवा कुटुंबियांना नियमितपणे नवीन रेशन कार्ड जारी करण्यात आले आहेत. सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) आधुनिक करण्यासाठी आणि याच्या कार्यात पारदर्शकता आणि कुशलता आणण्यासाठी अशाप्रकारचे अनेक प्रयत्न केले गेले आहेत.

रेशन कार्ड आणि लाभार्थ्यांच्या डेटाबेसचं डिजिटायझेशन करण्यासाठी, ते आधार कार्डशी जोडण्यासाठी, अपात्र किंवा खोट्या-बनावट रेशन कार्डची ओळख करण्यासाठी, डिजिटाईज केलेला डेटाची नक्कल रोखण्यासाठी आणि दुसऱ्या ठिकाणी गेलेल्या किंवा मृत्यू झालेल्या प्रकरणांची ओळख केल्यानंतर, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सरकारने २०१३ ते २०२० या काळात देशातील जवळपास ४.३९ कोटी रेशन कार्ड रद्द केले आहेत.नवी दिल्ली : अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने एनएफएएसए अंतर्गत योग्य लाभार्थ्यांची ओळख करण्यासाठी २०१३ पासूनचे ४.३९ कोटी बनावट रेशन कार्ड रद्द केले आहेत. रद्द केलेल्या रेशन कार्डच्या बदल्याद योग्य लाभार्थी किंवा कुटुंबियांना नियमितपणे नवीन रेशन कार्ड जारी करण्यात आले आहेत. सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) आधुनिक करण्यासाठी आणि याच्या कार्यात पारदर्शकता आणि कुशलता आणण्यासाठी अशाप्रकारचे अनेक प्रयत्न केले गेले आहेत.

लाभार्थ्यांना नवीन रेशनकार्ड जारी करण्याचे काम सुरु

पात्र लाभार्थी किंवा त्यांच्या कुटुंबियांना नवीन रेशन कार्ड जारी करण्याचं काम सुरू आहे.कायद्यानुसार, प्रत्येक राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशासाठी परिभाषित कव्हरेजच्या संबंधित मर्यादेत हे काम केले जात आहे.

Exit mobile version