Marathwada Sathi

गुडन्यूज: ‘पुष्पा 2 द रुल’ या चित्रपटाचा टीझर रिलीज

झुकेगा नही साला म्हणताच डोळ्यासमोर येतो तो अल्लू अर्जुनचा रावडी लुक अन् फाडू डायलॉग. ज्यांनी सर्वांनाच वेड करुन सोडलं होतं. ‘पुष्पा द राइज’नं बॉक्स ऑफिसवर आपलं वर्चस्व तर गाजवलचं त्याचबरोबर अल्लू अर्जुनला यशाच्या शिखरावर पोहचवलं. आता त्यांचे चाहते या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने प्रतिक्षा करत आहेत.अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2 द रुल’ या चित्रपटाबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. चाहते या चित्रपटाविषयी अपडेट जाणुन घेण्यासाठीही उत्सुक असतात. अशा परिस्थितीत या चित्रपटासंबधित एक नवीन अपडेट समोर आली आहे, जे चाहत्यांचा आनंद द्विगुणित करणार आहे.
‘पुष्पा’ चित्रपटाचा पहिला भाग पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये अजूनही जोरदार चर्चा आहे.

या चित्रपटातील अभिनेता अल्लू अर्जुनचा अभिनय आणि त्यांची स्टाईल चाहत्यांना खूप आवडली. आता दुसऱ्या भागात त्यांची स्टाईल किती बदलली आहे आणि त्यांचबरोबर चित्रपटात कलाकार कोणत्या लूकमध्ये दिसणार आहेत हेही कळेलच.’पुष्पा: द राइज’ चित्रपटाचे निर्माते ८ एप्रिल रोजी अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चित्रपटाच्या फ्रेंचायझीच्या दुसऱ्या भागाचा टीझर रिलीज करण्यासाठी सज्ज आहेत. निर्माते चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्याच्या तयारीत आहेत.

Exit mobile version