Marathwada Sathi

शिक्षकांसाठी आनंदाची बातमी…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : कोरोनामुळे राज्याची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती असे म्हणायला हरकत नाही. यावर उपाययोजना म्हणून वेगवेगळ्या ठिकाणच्या भरत्या लांबविण्यात आल्या होत्या. यामध्ये शिक्षकसेवक पदभरतीस देखील बंदी आणण्यात आली होती.मात्र,हि बंदी आता हटविण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ३ डिसेंबर ला पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून हा शासन निर्णय राज्य शासनाच्या कक्ष अधिकारी कविता तोंडे यांनी सोमवारी जाहीर केला आहे. शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी देखील यासंदर्भात अधिक माहिती दिली आहे.पवित्र पोर्टल च्या माध्यमातून उर्वरित ६ हजार पदे भरली जाणार आहेत.

दरम्यान,राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसोबतच खासगी अनुदानित,विना अनुदानित,अशंतः अनुदानित,अश्या शाळांमध्ये १२ हजार १४० शिक्षणसेवक व शिक्षकांच्या जागेसाठी हि भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

Exit mobile version