Marathwada Sathi

‘जिओ’ युजर्संसाठी ‘गुड न्यूज’…!

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : देशभरातील जिओ ग्राहकांसाठी गुड न्यूज आली आहे.टेलिकॉम ऑपरेटर रिलायन्स जिओने प्रत्येक नेटवर्कवर फ्री कॉलची घोषणा केली आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया (ट्राय) च्या निर्देशानुसार,आज (१ जाने.)पासून Bill and Keep नियम लागू करण्यात येणार आहे. यामुळे सर्व राज्यांतर्गत व्हाइस कॉलवर इंटरनकनेक्ट युजेस चार्जेस (IUC) संपणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार नॉन जिओ नेटवर्कवर राज्यांतर्गत व्हाइस कॉल चार्जला पुन्हा एकदा झीरो करण्यासाठी आणि आययूसी चार्ज संपण्यासोबत जिओ ग्राहकांना पुन्हा एकदा ऑफ नेट डोमेस्टिक फ्री व्हाइस कॉलचा फायदा मिळणार आहे. २०१९ च्या सप्टेंबर महिन्यात मध्ये TRAI ने Bill & Keep सिस्टम लागू करून टाइमलाइनला १ जानेवारी २०२० पर्यंत एक्सटेंड करण्यात आले होते.मात्र,आता जिओने आपल्या ग्राहकांना विश्वास दिला आहे की, युजर्संना केवळ ट्रायकडून आययूसी चार्ज हटवण्यापर्यंत हे चार्ज द्यावे लागणार आहेत.

Exit mobile version