Marathwada Sathi

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! तुरीच्या दरात मोठी वाढ


औरंगाबाद: कापसाची भाववाढ होत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच शेतकऱ्यांची तूर बाजारात दाखल झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी तुरीच्या भावात बरीच वाढ झालेलं दिसून येत आहे. गेल्यावर्षी तुरीचा भाव हा 5 हजार 250 असा होता. मात्र, यंदा 7 हजार 500 ते 8 हजार 050 पर्यंत भाववाढ झाल्याच औरंगाबाद कृषी बाजार समितीत पाहायला मिळत .
मराठवाड्यामध्ये कापूस, सोयाबीन, तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं . यावर्षीही तुरीला चांगला भाव मिळेल याचा अंदाज बांधून शेतकऱ्यांनी तुरीचे उत्पादन घेतलं. तुरीला यावर्षी चांगला भाव मिळत आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी पिकवलेल्या तुरीवर बुरशीचा आढळून आला होता तसेच काही ठिकाणी तूर फुलांच्या अवस्थेत आलेली असताना त्यावरती धुके पडलेले होते. त्यामुळे फुलं गळून पडली होती. तर काही ठिकाणी तुरीच्या झाडाला शेंगा आल्या त्या भरल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा 30 टक्के उत्पादनात घट झाली होती.

Exit mobile version