Marathwada Sathi

सोने २००० रुपयांनी स्वस्त , आणखी दर घसरण्याची शक्यता

बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचांदीचे दर कमी झाले आहेत. 3 दिवसात 2000 रुपयांनी सोन्याचे दर कमी झाले. गेल्या दोन दिवसांत सोन्याचांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. MCX वर सोन्याची वायदे किंमत 0.21 टक्क्यांनी कमी होऊन 48,485 रुपये प्रति तोळा तर चांदी 0.16 टक्क्याने कमी होऊन 59,460 रुपये प्रति किलो झाली आहे. आधीच्या सत्रात सोन्याची वायदा किंमत 900 रुपये तर चांदीची वायदा किंमत 1600 रुपयांनी कमी झाली होती

ब्रोकरेज फर्म एंजल ब्रोकिंगचे डेप्यूटी व्हीपी अनुज गुप्ता यांच्या मते या महिन्यात गोल्ड ईटीएफच्या होल्डिंगमध्ये 10 लाख औंसची घसरण झाली आहे. याचा अर्थ असा की गुंतवणूकदार हळूहळू सोन्यावरून होल्डिंग कमी करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात सोन्याचे दर कमी होऊ शकतात.
मोतीलाल ओसवालचे वीपी रिसर्च नवनीत दमानी यांच्या मते कोरोना लशीसंदर्भात समोर आलेल्या बातम्यामुळे सोन्याचांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. या काळात सोन्याबाबत सुरक्षित गुंतवणुकीची मागणी घटली आहे.

Exit mobile version